3 मार्च 1952 रोजी सांगोला तालुक्याचे शिक्षण महर्शी कै. गुरूवर्य बापूसाहेब झपके यांनी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि अल्पावधीतच या संस्थेचे रूपांतर वटवृक्षात झालेले आपणास पहावयास मिळत आहे.
काळाची आणि समाजाची गरज ओळखून सन 2008 साली सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाची स्थापना झाली. सध्या या विद्यालयामध्ये छोटा शिषु पासून इ. 4 थी पर्यंतचे वर्ग असून प्रत्येक इयत्तेच्या पाच तुकडया आहेत. त्यामध्ये 1002 विद्यार्थी शिक्षण घेत असून 29 शिक्षक व 8 शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत.
विद्यालयाची वैशिश्टये सांगायची झाल्यास सर्व सोयींनी युक्त अशि भव्य व प्रषस्त 2 मजली इमारत उभी आहे. तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकवृंद कार्यरत असून चित्रकला व क्रीडा शिक्षणासाठी विषेश शिक्षक आहेत. खेळासाठी प्रषस्त मैदान, भरपूर खेळाचे साहित्य विद्यालयात उपलब्ध आहे. तसेच छोटया मुलांसाठी विविध खेळणीयुक्त बगीचाही आहे. सुसज्ज असे गं्रथालय, संगणक लॅब व ई-क्लासची सोय देखील आहे. विद्याथ्र्यांना स्पर्धात्मक युगाची सवय करून देण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे देखील मार्गदर्षन विद्यालयात केले जाते. विविध सहशालेय व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, महापुरूशांच्या जयंत्या व पुण्यतिथींचे आयोजन व त्यानिमित्त सहशालेय स्पर्धा विद्यालयात राबविल्या जातात.
मुला व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याचे शुध्द पाणी (त्व् च्संदज) व विद्याथ्र्यांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे देखील बसविले आहेत. प्रत्येक महिन्यामध्ये शिक्षक-पालक सहविचार सभेचे आयोजन केले जाते. विद्याथ्र्यांसाठी विद्यालयाने स्कूल बसची सोय देखील उपलब्ध करून दिली आहे.
आज हे विद्यालय कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके यांचा आदर्ष डोळयासमोर ठेवून संस्थाध्यक्ष प्रा.श्री.प्रबुध्दचंद्र झपके सर व सर्व संस्था सदस्य यांच्या अनमोल मार्गदर्षनाखाली गगनभरारी घेत आहे.