संस्था स्थापना 

            सन १९५२ पूर्वी सांगोला तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची सोय नसल्यामुळे अनेक विद्यार्थी माध्यमिक शिक्षणापासून वंचित राहत होते. सामाजिक बांधीलकीचे भान असणा-या व स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ब्रिटीशांचा कारावासही भोगणा-या, गांधीवादावर निष्ठा असणा-या व सानेगुरुजी आदर्श असणाऱ्या कै. गुरूवर्य बापूसाहेबांनी पंढरीच्या वाटेवर विद्यामंदिरच्या  रूपाने शैक्षणीक मुहुर्तमेढ रोवली आणि ख-या अर्थाने गोरगरीबांच्या व बहूजनांच्या मुलांना शिक्षण घेता आले आणि आजही घेत आहेत आणि यापुढेही  घेत राहणार आहेत .
               आमचे संस्थापक अध्यक्ष ,मुख्याध्यापक  कै. गुरूवर्य बापूसाहेबांनी काही आदर्श घालून दिले. त्याच परंपरेचा पाईक होण्याचा मान कै. शोभनतारा उर्फ बाईसाहेब झपके यांना मिळाला. सन १९८१ ते १९९८ पर्यंत संस्थेच्या अध्यक्ष पदाची धूरा कै. शोभनतारा उर्फ बाईसाहेब झपके यांनी समर्थपणे सांभाळले व १९९८ पासून आमचे विद्यमान संस्थाअध्यक्ष मा. प्रबुध्दचंद्र झपके सरांनी ही धूरा आपल्या खांद्यावर घेवून शाळेची यशस्वी वाटचाल चालू ठेवली आहे.


Contact Us

Get On Touch

Locate Us on Map

Contact Information

Address : In front of Panchayat Samiti Sangola,
Tal. Sangola, Dist. Solapur, Maharashtra Pin 413307
Phone : (02187) 220210 Email : svmschoolsangola@gmail.com Site : www.stspm.org
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry