प्राचार्य मनोगत

श्री. राजेंद्र मारूती घोंगडे

           विद्यामंदिरच्या इतिहासात गेल्या काही वर्षात विद्यामंदिरचे अक्षरश: कात टाकत आहे. विद्यामंदिरची भव्य इमारत, टोलेजंग मैदान व सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधा बरोबरच विद्यामंदिरची गुणवत्ता याबाबतीत कसलीच तडजोड न करता परिवारातील सर्वच मंडळी त्यासाठी नेहमीच प्रयत्न करतात व त्याचे फळ म्हणून की काय स्कॉलरशीप , एन. एम एम. एस. एम. टी. एस. ,एन. टी. एस., 10 वी ,12 वी बोर्ड परीक्षा वगैरे सर्वच परीक्षांमध्ये विद्यामंदिरचे विद्यार्थी चमकताना आढळत आहेत. वरील सर्व परीक्षांसाठी नियमितपणे जादा तासांची व्यवस्था केली जाते, विद्याथ्र्यांचा सराव घेतला जातो व त्यासाठी योग्य मार्गदर्शन केले जाते|वरील स्पर्धा परीक्षामध्ये विद्यार्थी केवळ गुणवत्ताच प्राप्त करीत नाहीत तर राज्यपातळीवरील यादीमध्ये स्थान मिळविताना दिसत आहेत. इ. 10 वी व इ. 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 90 टक्के ते 95 टक्के हून अधिक असतात.
  
 
           विद्याथ्र्याच्या केवळ बौध्दिक विकासाबरोबरच सर्वांगिण विकासासाठी विद्यामंदिर नेहमीच विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. खेळामध्ये प्रशालेच्या काही विद्याथ्र्यांनी सांघिक व वैयक्तिक प्रकारामध्ये उत्तम यश मिळविले आहे. काही विद्याथ्र्यांनी जिल्हा व राज्यपातळीवर प्रशालेचे प्रतिनिधित्व केले आहे.

           2 ऑक्टोंबर 1969 पासून दर शुक्रवारी साजरी होणारी गांधी प्रार्थना व सानेगुरूजी कथामाला हे आपल्या विद्यामंदिरचे भूषण मानावे लागेल. प्रार्थनेच्या निमित्ताने मुलांना एक गांधी विचार सांगितला जातो. नव्या पिढीला गांधीजींच्या विचारांची ओळख व्हावी हाच त्यापाठीमागचा हेतू आहे. सानेगुरूजी कथामालेच्या माध्यमातून बोध कथा सांगितली जाते|मुलांवर कळत ­नकळत संस्कार केले जातात.

           एन. सी. सी. ,स्कॉऊट गार्इड या माध्यमातून शिस्तीचे राष्ट्रभक्तिचे धडे विद्याथ्र्याकडून गिरवून घेतले जातात. शिस्तप्रिय व सामाजीक बांधिलकी मानणारे सुजाण नागरीक या विद्यामंदिरमध्ये नक्किच घडत आहेत.
           
           सहली, निसर्ग शिबीरे इ. आयोजन करून निसर्गाविषयीची जागरूकता ,त्याची भव्यता मुलांना समजावली जाते.
     

 

 
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry