15 ऑगष्ट साली आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशाच्या सर्वागीण विकासाचे नवे पर्व सुरू झाले होते कोणत्या न कोणत्या ध्येयवादाने भारलेली माणसे जीवनाच्या विविध क्षेञात अस्तित्वात होती उदयास येत होती याच काळाच्या महिम्याने कै गुरूवर्य बापूसाहेबांना सांगोल्यासारख्या परंपरागत दुष्काळी भागात शैक्षणीक कार्यासाठी प्रवॄत्त केले
कै. गुरूवर्य बापूसाहेबांची राष्ट्रपिता म. गांधी यांच्या विचारांवर मोठी श्रदधा होती. 1942 च्या चलेजाव आंदोलनात सहभाग घेतला होता त्याबद्द्रल ब्रिटीश सरकारने त्यांना येरवडा पुणे येथील कारागॄहात स्थान बद्ध केले होते. त्याठिकाणी त्यांना व. पू. साने गुरूजी व इतर देशभक्ताचा सहवास लाभला. साने गुरूजीच्या प्रत्यक्ष सहवासातून झालेल्या संस्कारातून कै. गुरूवर्य बापूसाहेंबाना अंतर्बाहय प्रेरित केले. हीच प्रेरक शक्ती घेऊन 3 मार्च 1952 रोजी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची व विद्यामंदीरची स्थापना करण्यात आली. तत्पूर्वी माध्य. शिक्षणाची कसलीच सोय या तालुक्यामध्ये नसल्यामुळे अत्यंत गरजू गरीब व होतकरू विद्यार्थांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. समाजऋणांची जाणीव असणाया कै. गुरूवर्य बापूसाहेबांनी हे समाजऋण फेडण्यासाठी या पंढरीच्या वाटेवर विद्यामंदीरची मुहुर्तमेढ रोवून माध्य. शिक्षणांची दारे सर्वासाठी खुली केली.
प्रातिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत शिक्षण घेणाय्या विद्यार्थीना कै. बापूसाहेबांचा मोठा आधार वाटायचा कै. गुरूवर्य बापूसाहेबांनी ध्येयवादाने व्रतस्थ व अविचल निष्ठेने आपले आयुष्य या विद्यामंदीरसाठी समर्पित केले. कै. बापूसाहेब हे हाडाचे शिक्षक होते. या आधुनिक द्रोणाचार्याचे विद्यार्थी आज महाराष्ट्रभर व महाराष्ट्राच्या बाहेरही पसरलेले आहेत. सरकारी व खाजगी संस्थामध्ये उच्च पदे भूषवित आहेत व या देशाच्या सर्वागीण विकासात आपला वाटा उचलीत आहेत. विद्याथ्र्याच्या कित्येक पिढयंवर त्यांनी केलेल्या संस्काराचे ऋण कधीही न फिटणारे असेच आहे व हे संस्कार हया विद्याथ्र्याच्या आयुष्यात कायम दीपस्तंभाची भूमिका बजावत राहतील हे ही अगदी निश्चीत. प.पु.कै. गुरूवर्य बापूसाहेबांच्या पश्चात साक्षात हिमालयाची सावली असणाया कै. बापूसाहेब झपके यांनी संस्थेची धुरा तितक्याच समर्थपणे पेलली. 1998 साली संस्थाध्यक्ष म्हणून प्रा. प्रबुदधचंद्र झपके यांच्याकडे ही धुरा आली. दर्जा आणि गुणवत्ता याबाबतीत कसलीच तडजोड न करता विद्यामंदिरचा लौकिक वाढविण्याच्या प्रयत्न प्रा. झपके सरांनी केले. नव्या युगाची आव्हाने स्वीकारत हे विद्यामंदीर आज सर्वाधाने प्रगतीचे टप्पे पार करते आहे. दर शुक्रवारची गांधी प्रार्थना व साने गुरूजी कथामाला हा उपक्रम गेली 50 वर्षे विद्याथ्र्याचा मनावर आणि व्यक्तीमनावर रचनामत्क संस्कार करण्याचे काम करीत आहे. स्कॉलरशीप एम .टी.स. एन टी एस या परीक्षेसह इ. 10 वी व 12 वी मध्ये अनेक विद्यार्थी उत्तमात उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण होत आहेत.