मी नारायण विसापुरे नाझरा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज नाझरा येथे मुख्याध्यापक/प्राचार्य म्हणून काम करीत आहे. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरूवर्य बापूसाहेब झपके यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थीच्या सोयीसाठी नाझरा विद्यामंदिर ही शाखा 08 जून 1960 रोजी सुरू केली. सध्या नाझरा विद्यामंदिर ला 58 वर्श पुर्ण होत आहेत. गेल्या 58 वर्षामध्ये शाळेच्या प्रगती साठी माजी मुख्याध्यापक/प्राचार्य , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा -य़ानी यांनी आपले बहूमोल योगदान दिलेले आहे. शाळेची एक सुसज्य देखणी इमारत असून प्रषालेमध्ये 5 वी ते 12 वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रषालेत मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाचे 5 वी ते 10 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत, ज्युनिअर काॅलेजमध्ये कला व वाणिज्य शाखेचे वर्ग सुरू आहे. प्रषालेची इ. 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थीची गेल्या पाच वर्षामध्ये संख्या 950 आसपास आहे. विद्यार्थी संख्येमध्ये ही ग्रामीण भागाचा विचार करता सर्व प्रथम आहे. एक नामांकित शाळा अशी नाझरा विद्यामंदिरची ख्याती आहे. प्रषाला व ज्युनिअर काॅलेज मध्ये 24 शिक्षक व 8 शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहे. प्रषाला व ज्युनिअर मधील सर्व शिक्षक अतिषय कष्टाळू व मनमिळावू आहेत, त्याचबरोबर विद्यार्थीची फार काळजी घेणारे आहेत. शिक्षकेत्तर वर्ग सुध्दा अतिषय प्रामाणिक पणे काम करीत आहेत. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या या प्रामाणिक पणाने काम करण्यामुळे शाळेच्या विद्यार्थी संख्येमध्ये नेहमीच भर पडत आहे. नाझरा विद्यामंदिर येथे जवळ पासच्या आठ गावामधून विद्यार्थी चालत / सायकल / बस मधून येजा करतात. यामध्ये नाझरे व परिसरामधील चिणके, चोपडी, कारंडेवाडी, पाचेगाव प्रामुख्याने अनकढाळ, बलवडी, झापाचीवाडी या सारख्या दुरच्या गावामधून विद्यार्थी ये जा करतात. नाझरा गावामध्ये अजून एक विद्यालय असून सुध्दा आपल्या शाळेची एकूण विद्यार्थी संख्या ही हजाराच्या घरात आहे.
शाळेची गुणवत्ता तर खूपच आहे शाळेमध्ये सर्व बाहय परीक्षांचे आयोजन केले जाते त्यामध्ये महत्वाची स्काॅलरषिप, एन.एम.एम.एस, एन.टी.एस, एम.टी.एस, चित्रकला परीक्षा, मराठी साहित्य परिशद मार्फत घेतली जाणारी परीक्षा, गेल्याच वर्षी स्काॅलरषिप परीक्षमध्ये नाझरा विद्यामंदिरमध्ये 5 वी चे 8 विद्यार्थी व 8 वी चे 15 विद्यार्थी शिश्यवृत्तीस प्राप्त झाले होते. त्यामध्ये उल्लेखनिय बाब म्हणजे इ. 8 वी च्या स्काॅलरषिप मधून कुमारी अनुजा अदिनाथ गुरव ही विद्यार्थीनी ग्रामिण भागात राज्य गुणवत्ता यादी मध्ये तिने यश प्रात्प केले होते. तिचा योग्य तो सत्कार सोलापूर येथे सी. ओ. साहेबांच्या हस्ते झाला होता, त्याचबरोबर सां.ता.षि.प्र. मंडळाच्या वतीने मा. अध्यक्ष पी. सी. झपके सर यांच्या हस्ते सांगोला विद्यामंदिर येथे करण्यात आला होता. 8 वी साठी असणाÚया एन.एम.एम.एस या परीक्षेत जर वर्शी चांगल्या संख्येने मुले यषस्वी होतात. या वर्षी सुध्दा 13 विद्यार्थी हे गुणवत्ता प्राप्त झालेले आहेत. इ. 10 वी निकाल नेहमीच 90 टक्के च्या वर लागत असतो. दरवर्षी जवळपास 125 च्या वरती 10 वी ला विद्यार्थी असतात, सेमी माध्यमाचा निकाल हा 100 टक्के व मराठी माध्यमाचा 95 टक्के च्या आस पास असतो.चालू वर्षीचा म्हणजे 2017-18 चा 10 वी निकाल हा सेमी व मराठी माध्यमाचा 100 टक्के लागला असून शिवम काषिनाथ शळके हा 94.00 टक्के गुण प्राप्त करून नाझरा केंद्रामध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर मराठी माध्यमाचा 97.10 टक्के निकाल लागला असून कुमारी सुनिता आबा देवकुळे या विद्यार्थीनीने 90.07 टक्के गुण मिळवले आहेत. इ. 12 वी संयुक्त या वर्गाचा निकाल तर नेहमीच 100 टक्के असतो. या वर्षीचा म्हणजे 2017-18 चा निकाल 100 टक्के लागला आहे. कु. पाटील अंकिता अषोक या विद्याथ्र्यीनीने वाणिज्य षाखेतून 650 पैकी 551 गुण म्हणजेच 84.76 टक्के गुण मिळवून काॅलेजमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. तर कला षाखेमधून पाटील स्वप्नजित नानासो या विद्यार्थीने 650 पैकी 495 गुण म्हणजेच 76.15 टक्के मिळवून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.या शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच खेळातही ही मुले जिल्हा, विभागस्तर व राज्यस्तरावर खेळून यशस्वी झालेली आहेत. कु. स्वाती सरगर ही विद्यार्थीनी नेटबाॅल मध्ये राज्यस्तरावर दिल्ली येथे खेळलेली आहे. सर्व प्रकारच्या स्पर्धामध्ये बाबतीत मुलांचा सहभाग असतात. शाळेत एक छानसी संगणक लॅब असून इ. 5 वी ते 12 वी चे विद्यार्थी त्याचा लाभ घेतात.इ.5 वी मध्ये नव्याने प्रवेष घेणाÚया मुलांसाठी 5 वी वासंतीक वर्ग मे महिन्यात चार आठवडे भरवले जातात.
प्रषाला व ज्युनिअर काॅलेजमधील विद्यार्थीनसाठी वर्षी भरामध्ये करिअर मार्गदर्षन शिबीराचे आयोजन केले जाते. त्यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत तज्ञांचे मार्गदर्षन घेतले जाते. या मार्गदर्षन शिबीरामुळेच आमच्या शाळेचे विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये विविध पदावर काम करीत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने डाॅक्टर, इंजिनिअरर्स, वित्त लेखाधिकारी, विक्रीकर आयुक्त, विक्रीकर निरीक्षक, पी.एस.आय, प्राध्यापक, प्राथमिक शिक्षक इ. ही बाब आमच्या शाळेसाठी व संस्थेसाठी भूशणावह आहे. व याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
सन 2018-19 या वर्शी संस्थेने एक नविन पाऊल उचलेले आहे. सांगोला व कोळा या ठिकाणी ज्या प्रमाणे इंग्लिष मेडीयम चे वर्ग सुरू आहेत. त्या धर्तीवर नाझरा विद्यामंदिर मध्ये सी.बी.एस.ई. पॅटर्न चे इंग्लिष मेडीयमचे वर्ग सुरू करण्याचे ठरवले आहे. त्याच बरोबर ग्रामीण भागातील मुलांसाठी 11 वी विज्ञान शाखेचा वर्ग सुरू करण्यात येणार आहे. हे दोन नवीन विभाग सुरू करीत असलेबदद्ल मी संस्थेचा आभारी आहे.
समारोपामध्ये मी मुख्याध्यापक/प्राचार्य म्हणून एवढेच सांगतो की माझ्यावर 2014 मध्ये दिलेली जबाबदारी मी समर्थपणे स्विकारली आहे, व शाळेचा चार वर्शात बरीचशी प्रगती करण्याचा प्रयत्न मी सात्यत्याने करत आहे. या सर्व शाळेच्या यषामध्ये सर्वश्री संस्थेचे अध्यक्ष प्रा. पी. सी. झपके सर व संस्था कार्यकारणी सदस्य शिक्षक व शिक्षकेतर यांचे खुप खुप सहकार्य असल्यामुळेच मी सर्व करू शकत आहे. मी मुख्याध्यापक या नात्याने सर्व व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्थेचे पदाधिकारी यांचा ऋणी आहे.
!! धन्यवाद !!