सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरूवर्य बापूसाहेब झपके यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थीच्या सोयीसाठी नाझरा विद्यामंदिर ही शाखा 08 जून 1960 रोजी सुरू केली. सध्या नाझरा विद्यामंदिर ला 58 वर्श पुर्ण होत आहेत. गेल्या 58 वर्षामध्ये  शाळेच्या प्रगती साठी माजी मुख्याध्यापक/प्राचार्य , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा -य़ानी यांनी आपले बहूमोल योगदान दिलेले आहे. शाळेची एक सुसज्य  देखणी इमारत असून प्रषालेमध्ये 5 वी ते 12 वी पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रषालेत मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाचे  5 वी ते 10 वी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत, ज्युनिअर काॅलेजमध्ये कला व वाणिज्य शाखेचे वर्ग सुरू आहे. प्रषालेची इ. 5 वी ते 12 वी च्या विद्यार्थीची गेल्या पाच वर्षामध्ये संख्या 950 आसपास आहे.विद्यार्थी संख्येमध्ये ही ग्रामीण भागाचा विचार करता सर्व प्रथम आहे. एक नामांकित शाळा अशी नाझरा विद्यामंदिरची ख्याती आहे.  प्रषाला व ज्युनिअर काॅलेज मध्ये 24 शिक्षक व 8शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहे.  प्रषाला व ज्युनिअर मधील सर्व शिक्षक अतिषय कष्टाळू व मनमिळावू आहेत, त्याचबरोबर विद्यार्थीची फार काळजी घेणारे आहेत.  शिक्षकेत्तर वर्ग सुध्दा अतिषय प्रामाणिक पणे काम करीत आहेत. शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या या प्रामाणिक पणाने काम करण्यामुळे शाळेच्या विद्यार्थी संख्येमध्ये नेहमीच भर पडत आहे. नाझरा विद्यामंदिर येथे जवळ पासच्या आठ गावामधून विद्यार्थी चालत / सायकल  / बस मधून येजा करतात. यामध्ये नाझरे व परिसरामधील चिणके, चोपडी, कारंडेवाडी, पाचेगाव प्रामुख्याने अनकढाळ, बलवडी,झापाचीवाडी या सारख्या दुरच्या गावामधून विद्यार्थी ये जा करतात. नाझरा गावामध्ये अजून एक विद्यालय असून सुध्दा आपल्या शाळेची एकूण विद्यार्थी संख्या ही हजाराच्या घरात आहे.



Contact Us

Contact Us

Get On Touch

Locate Us on Map

Contact Information

Address : नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनियर कॉलेज, नाझरा Phone : 02187 222 200 Email : svmschoolsangola@gmail.com Site : www.stspm.org
cheap jordans|wholesale air max|wholesale jordans|wholesale jewelry