ग्रामीण भागामधील लोकांना आमच्या इतके शिक्षणाचे महत्व 50-60 वर्षापूर्वी वाटत नव्हते. अशावेळी मुलांना विशेषत: मुलींना शाळेत पाठविण्याविषयी शिक्षकांना पालकाचे प्रबोधन करावे लागत असे. अशावेळी कोला परिसरातील मुलांना शिक्षणाची गोडी वाढवून त्यांना सक्षमपणे जीवनात उभे करण्याचे काम कोला मंदीरने केले आहे.
वैधकीय अभियांत्रिकी न्याय विधी संरक्षण पोलीस शिक्षण व्यापार शेती अशा जीवनाच्या विविध क्षेत्रात मातब्बरी करीत कोला विद्यामंदीरच्या विद्याथ्र्यानी हायस्कूल व कोला गावाचा लौकीक वाढविला आहे. संजय मारूती कोळेकर - न्यायाधीश‚ उत्तमराव कोळेकर - वरिष्ठ पोलीस अधिकारी‚ विजय कोळेकर - विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ‚ अॅड. सचिन लक्ष्मण देशमुख - जि. प. सदस्य‚ हौस्याबापू निवॄत्ती सरगर - सर्कल अधिकारी‚ श्रीमती रेखा विठ्ठल आलदर - महाराष्ट्र् लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण हो}न उच्च पदस्य अधिकारी. या सा¹या माजी विद्याथ्र्यानी कोला वि. मं. चा कीर्तीसुगंध सर्वदूर पसरवला आहे.
शैक्षणीक गुणवत्ता वाढीबरोबरच क्रीडा विभागाची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. दरवर्षी जिल्हा विभागीय व राज्यस्तरीय स्पर्धामध्ये नैपूण्य प्राप्त करीत असतात. मन मनगट आणि मेंदू विकसीत करण्याचे काम अविरतपणे कोला वि. मं. गेली 6 दशके करीत आहे. अलीकडच्या काळात ज्यु. काॅलेज मध्ये कला शाखेबरोबर शास्ञ शाखा सुरू केली असून 12 वी शास्ञ शाखेचा निकाल 100 ‰ इतका असतो. तर एस्.एस्.सी. चा परीक्षेचा निकाल कायमच 90 ‰ हून अधिक लागतो आहे.
अलिकडच्या काळात गायकवाड मुख्याध्यापक प्राचार्य पदाची धुरा सांभाळताना सर्व शिक्षंकाच्या सहकार्याच्या बळावर अनेक सहशालेय उपक्रम राबवून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. 5 वी 8 वी स्कालरशीप NMMS, MTS, NTS, चिञकला वगैरे स्पर्धा परीक्षामध्ये कोला वि. मं. चा आलेख सतत चढता आहे. महापुरूषांच्या जयंती‚ पुण्यतिथी‚ राष्ट्रीय सण सहल क्रीडा स्पर्धा स्नेहसंमेलन या माध्यमातूनही विद्याथ्र्याच्या सुप्त गुणांना वाव देतानाच कळत नकळत संस्कारही केले जात आहेत.
सांगोल्यात माध्य. शिक्षणाची सोय झाली खरी परंतू कोल्यासारख्या भागातून आर्थिक परिस्थितीमुळे काही मुले सांगोल्यात सुदधा ये}न शिकू शकत नाहीत हे पाहून कै. गुरूवर्य बापूसाहेबांनी कोला या ठिकाणी माध्य. शिक्षणाची सोय ग्रामस्थांच्या सहकार्याने करून दिली. 25 मे 1959 या दिवशी कोला वि. मं. ची स्थापना करण्यात आली. आज कोला वि.मं. प्रगतीचे अनेक टप्पे पार करतानाच आपल्या आयुष्याच्या साठी मध्ये हीरक महोत्सवी वर्षामध्ये प्रवेश करीत आहे. इनामदार सर‚ टी. पी. देशमुख‚ खाडे सर‚ कोळेकर एम. वी.‚ पोरे वी. वी. ‚ मोहिते वी. एस.‚ माहिनकर एस. डी. व गायकवाड या मंडळीनी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी तर पार पाडलीच परंतू संपूर्ण पंचक्रोशीत ग्रामस्थांच्या सहकार्यातून लोक सहभागातून या कोला वि. मं. चा पाया काढण्यापासून ते आताच्या भव्य आणि विस्तीर्ण इमारतीपर्यंतच्या गोष्टी पार पाडल्या आहेत. केवळ विद्याथ्र्याना अभ्यासाबरोबरच जीवण घडणीचे संस्कार तर दिलेच परंतू गरजेनुसार पंचक्रोशीतील ग्रामस्थांचेही प्रबोधन केले म्हणून तर ही शाळा सा¬या परीसरालाच आपली शाळा वाटते आहे. जवळपास 35 वर्षे मुख्याध्यापक पद सांभाळणा¬या टी.पी. देशमुख सरांचे योगदान याकामी निश्चीतच मोठे आहे. प. पू. कै. गुरूवर्याना अभिप्रेत असेकाही शाळा चालवून ती उत्क्रष्ठ निकालांची परंपरा व गुणवत्तापूर्ण म्हणून नावारूपास निश्चीतपणे आणली आहे.