कोळा विद्यामंदिरचे जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत घवघवीत यश स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विद्यामंदिर कोळा येथे संविधानाचा जागर हा कार्यक्रम संपन्न कोळा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज कोळा येथे इ . ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न कोळा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज कोळा येथे गुरुपौर्णिमा साजरी कोळा विद्यामंदिरमध्ये सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार व निरोप सोहळा संपन्न
सांगोल्यात माध्य. शिक्षणाची सोय झाली खरी परंतू कोळ्यासारख्या भागातून आर्थिक परिस्थितीमुळे काही मुले सांगोल्यात सुदधा येऊन शिकू शकत नाहीत हे पाहून कै. गुरूवर्य बापूसाहेबांनी कोळा या ठिकाणी माध्य. शिक्षणाची सोय ग्रामस्थांच्या सहकार्याने करून दिली. 25 मे 1959 या दिवशी कोळा वि. मं. ची स्थापना करण्यात आली. आज कोळा वि.मं. प्रगतीचे अनेक टप्पे पार करतानाच आपल्या आयुष्याच्या साठी मध्ये हीरक महोत्सवी वर्षामध्ये प्रवेश करीत आहे. इनामदार सर‚ टी. पी. देशमुख‚ खाडे सर‚ कोळेकर एम. वी.‚ पोरे वी. वी. ‚ मोहिते वी. एस.‚ माहिनकर एस. डी. व गायकवाड या मंडळीनी मुख्याध्यापक पदाची जबाबदारी तर पार पाडलीच परंतू संपूर्ण पंचक्रोशीत ग्रामस्थांच्या सहकार्यातून लोक सहभागातून या कोळा वि. मं. चा पाया काढण्यापासून ते आताच्या भव्य आणि विस्तीर्ण इमारतीपर्यंतच्या गोष्टी पार पाडल्या आहेत. केवळ विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच जीवण घडणीचे संस्कार तर दिलेच परंतू गरजेनुसार पंचक्रोशीतील ग्रामस्थांचेही प्रबोधन केले म्हणून तर ही शाळा सा-या परीसरालाच आपली शाळा वाटते आहे. जवळपास 35 वर्षे मुख्याध्यापक पद सांभाळणा-या टी.पी. देशमुख सरांचे योगदान या कामी निश्चीतच मोठे आहे. प. पू. कै. गुरूवर्याना अभिप्रेत असे काही शाळा चालवून ती उत्कृष्ठ निकालांची परंपरा व गुणवत्तापूर्ण म्हणून नावारूपास निश्चीतपणे आणली आहे.